अभिनंदन

अभिनंदन

पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम मधील इयत्ता ४ थी मध्ये शिकणारा प्रणय प्रशांत (प्रीति) पास्टे याने दिनांक २५ – २७ मे २०२२ दरम्यान नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये दहापेक्षा अधिक देशांनी आपला सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेमध्ये प्रणय प्रशांत (प्रीति) पास्टे याने कराटे मधील विविध इव्हेंटमध्ये भाग घेऊन आपल्या देशाला १ सुवर्ण पदक ३ रौप्य व ३ कास्य पदके अशा एकूण ७ पदकांची दमदार कमाई केली. त्याच्या या कामगिरीमुळे देशाचे, पार्ले टिळक विद्यालय तसेच पार्ले टिळक विद्यालय एसोसिएशनचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्वल केले आहे. या स्पर्धेसाठी श्री अरविंद चव्हाण, श्रीमती विभावली सापळे अशा आंतरराष्ट्रीय पदक विजेते व प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन त्याला लाभले.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये दमदार कामगिरीबद्दल प्रणयचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top