कम्रेड मॅरेथॉन मधे पार्लेकर सुजीत गोरे यांचे यश

कम्रेड मॅरेथॉन मधे पार्लेकर सुजीत गोरे यांचे यश

कम्रेड मॅरेथॉन मधे पार्लेकर सुजीत गोरे यांचे यश

 

२८ ऑगस्ट २०२२ रोजी दक्षिण आफ्रिका येथे जगातील सर्वात जुनी, लांब, अवघड आणि शरीर व मानसिक बलाची परीक्षा घेणारी कॉम्रेड मॅरेथॉन झाली. त्यामधे ९० कि मी अंतर जास्तीत जास्त १२ तासात पूर्ण करणे अपेक्षित असते. विलेपार्ले येथील रहिवासी श्री सुजीत गोरे ( वय ५९) यांनी ही दौड अकरा तास अडतीस मिनिटात यशस्वीरीत्या पूर्ण केली.

सुजीत गेली पाच वर्षे ‘टॉप गियर’ या संस्थेमध्ये मॅरेथॉन चे प्रशिक्षण घेत आहेत. आतापर्यन्त २५ अर्ध, १५ पूर्ण आणि तीन वेळेस अवघड अशी ५५ किमी ची टाटा अल्ट्रा दौड त्यांनी पूर्ण केली आहे. पार्ले टिळक शाळेत असताना क्रिकेट त्यानंतर बॅडमिंटन या खेळात त्यांनी प्रावीण्य मिळवले होते.

९० की मी अंतर वेळेत पार करणे हे स्वप्न उराशी बाळगून सुजीत गेले वर्षभर रात्रंदिवस मेहनत घेत होते. वेळापत्रका नुसार भल्या पहाटे ४:३० ला ऊठुन त्यांचा दिवस सुरु होत असे. यासाठीचे मार्गदर्शन ‘टॉप गियर’ चे सॅमसंग सर यांनी केले. पूर्वी ह्या मॅरेथॉन मधे भाग घेतलेल्या टॉप गियर मधील मित्रांनी, विशेषत: माधव जोशी यांनी वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करुन प्रोत्साहन दिले.

सर्वांनी प्रयत्न करुन आपली शारीरिक क्षमता वाढवावी आणि त्यासाठी आवश्यक तो व्यायाम सातत्याने करावा असे त्यांना वाटते. जिद्द, मेहनत, योग्य आहार, तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन आणि समविचारी मित्रांची साथ हे माझ्या यशाचे रहस्य आहे असे ते म्हणतात.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top